जम्बो मेगा ब्लॉक । कोकण रेल्वे मार्गावरील या महत्वाच्या गाड्या रद्द
Jumbo mega block on Central Railway : मध्य रेल्वे मार्गावर जम्बो मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. याचा फटका कोकण रेल्वेला ( Konkan railway) बसणार आहे. कोकणात जाणाऱ्या सुफरफास्ट गाड्या या मेगा ब्लॉकमुळे रद्द करण्यात आल्या आहेत.
मुंबई : Jumbo mega block on Central Railway : मध्य रेल्वे मार्गावर जम्बो मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. याचा फटका कोकण रेल्वेला ( Konkan railway) बसणार आहे. कोकणात जाणाऱ्या सुफरफास्ट गाड्या या मेगा ब्लॉकमुळे रद्द करण्यात आल्या आहेत. तेजस, जन शताब्दी, एसी डबल डेकर तसेच कोच्युवली, मंगलोर, हुबळी एक्सप्रेस या गाड्या रद्द केल्या गेल्या आहेत. काही गाड्या या पनवेलपर्यंत धावणार आहेत. (Jumbo mega block on Central Railway. Many express train on the Konkan railway line cancelled)
कोकणात जाणाऱ्या काही रद्द करण्यात आल्या आहेत. त्याचप्रमाणे डेक्कन एक्सप्रेस, डेक्कन क्वीन एक्सप्रेस, जालना जन शताब्दी, कोयना एक्सप्रेस, पंचवटी एक्सप्रेसह 100 एक्सप्रेस गाड्या तीन दिवस रद्द करण्यात आल्या आहेत. मध्य रेल्वेवर सुमारे 72 तासांचा जम्बो मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेच्या ठाणे ते दिवा स्थानकादरम्यान हा जम्बो मेगा ब्लॉक आहे.
हा मेगा ब्लॉक 5 ते 7 फेब्रुवारी 2022 दरम्यान असणार आहे. या मेगा ब्लॉकमुळे 350 लोकल या दिवशी धावणार नाहीत. त्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होणार आहे. ठाणे ते दिवा स्थानकादरम्यान पाचव्या लाईनवर आणि दिवा ते ठाणे स्थानकादरम्यान अप फास्ट लाईन आणि सहाव्या लाईनवर हा ब्लॉक असणारआहे. त्यामुळे कोकणात जाणाऱ्या सर्व गाड्या तीन दिवस बंद राहणार आहेत.
दिवा-वसई मेमु ट्रेन रद्द करण्यात आली आहे. अनेक गाड्या पनवेल स्थानकात थांबवण्यात येणार आहेत. तर सर्व फास्ट जलद लोकल गाड्या धिम्या मार्गावर वळवल्या जाणार आहेत. मध्य रेल्वेवरील पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेच्या कामांसाठी आतापर्यंत अनेक मोठे जम्बो मेगाब्लॉक घेण्यात आले आहेत. मात्र अजूनही दोन ब्लॉक शिल्लक असल्याचे मध्य रेल्वेने सांगितले आहे. या दोन मेगाब्लॉकनंतर पाचवी आणि सहावी मार्गिका कार्यन्वित होईल, असे सांगण्यात आले आहे.