नगरसेविकेच्या पतीची सरकारी अधिकाऱ्याला मारहाण
नांदेड महापालिकेतील कनिष्ठ अभियंत्याला भाजपा नगरसेवीकेच्या पतीकडून मारहाण झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आलीय.
नांदेड : नांदेड महापालिकेतील कनिष्ठ अभियंत्याला भाजपा नगरसेवीकेच्या पतीकडून मारहाण झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आलीय.
मारहाणीचा व्हिडिओ बनवला...
पालीकेचे कनिष्ठ अभियंता संदीप पाटील यांना ड्रेनेज लाईनच्या कामासाठी नगरसेवीकेचे पती दीलीप सिंघ सोडी यांनी बोलावलं होतं... काम वेळेत न झाल्याने सोडी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी संदीप पाटील यांना मारहाण केली. शुक्रवारी सायंकाळी हा प्रकार घडला.
मारहाणीचा व्हिडिओ वायरल
धक्कादायक म्हणजे, सोडी यांच्या कार्यकर्त्यांनीच या घटनेचा व्हिडिओ काढून तो व्हायरल केला. परंतु, ही गोष्ट समोर आल्यानंतर सोडी यांच्यावर त्यांचं हे 'कर्तृत्व' उलटलं.
पालिका कर्मचाऱ्यांचं काम बंद
हा व्हिडिओ पाहून खवळलेल्या पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी या मारहाणीच्या निषेधार्थ कामबंद करुन पालिकेसमोर ठिय्या केला. या घटनेनंतर पालिकेच्या कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी कामबंद केले.
सर्वसाधारण सभा तहकूब
कामबंद आंदोलनामुळे महापालिकेची आजची सर्वसधारण सभादेखील तहकूब करण्यात आली. संबंधित नगरसेविकेचे सदस्यत्व रद्द करण्यासाठी न्यायालयात जाण्याचा ठराव सर्वसाधारण सभेत मांडण्यात आला.
सोडीला अटक
दरम्यान, मारहाण प्रकरणात ईतवारा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. नगरसेविकेचे पती दिलीप सिंघ सोडी यांना अटक करण्यात आलीय.