पुणे : पुण्यातल्या शिरूरमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. शाळेच्या मैदानावर कबड्डी खेळत असताना एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाला आहे. गौरव अमोल वेताळ असं या खेळाडुचं नाव होतं. 


कबड्डीचा सुरु होता सामना


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शिक्रापूरजवळ असलेल्या पिंपळे जगतापमधल्या नवोदय विद्यालयात तो आठवीत शिकत होता. शनिवारी संध्याकाळी साडे सात वाजता शाळेच्या मैदानावर कबड्डीचा सामना सुरू होता. त्यावेळी गौरव अचानक मैदानावर कोसळला आणि त्यातच ज्याचा जागीच मृत्यू झाला. शिक्षकांनी त्याला खासगी रूग्णालयात दाखल केलं पण त्याआधीच त्याचा मृत्यू झाला होता.


पाहा घटनेचा व्हिडिओ



उन्हाळ्यात घ्या काळजी


कबड्डी खेळताना आठवीतल्या मुलाचा मृत्यू झाल्याची ही घटना धक्कादायक आहे. यानिमित्तानं उन्हाळ्यात तब्येत्तीची काळजी घ्यायलाच हवी.