पुणे : शवविच्छेदनानंतर कैलास गिरवले यांचा मृतदेह नगरकडे रवाना करण्यात आला आहे. मारहाण करणा-या  पोलीस अधिकारी आणि कर्मचार्यांवर खुनाचा गुन्हा दाखल करावा. अशी मागणी बाबासाहेब गिरवले यांनी केली आहे. तसेच कैलास गिरवले यांच्या पत्नीने  देखील नगरच्या कोतवाली पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. पोलीसांनी जनावराप्रमाणे माझ्या भावाला मारहाण केली. असा आरोप बाबासाहेब गिरवले यांनी केला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नगर पोलीस अधीक्षक कार्यालय तोडफोड प्रकरणी अटक असलेले आरोपी कैलास गिरवले यांचा पुण्यातील ससून रुग्णालयात मृत्यू झालाय. गिरवले पोलिस कोठडीत असताना त्यांची प्रकृती बिघडली होती. त्यामुळे त्यांना उपचारासाठी ससूनमध्ये दाखल करण्यात आलं होतं. मात्र सोमवारी रात्री ८.५० ला त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. 



गिरवले हे अहमदनगर महापलिकेत मनसेचे स्विकृत सभासद होते. तसेच ते आमदार संग्राम जगताप यांचे समर्थक मानले जात. केडगाव मधील शिवेसेना कार्यकर्त्यांच्या दुहेरी खुनानंतर नगर पोलिसांनी आमदार जगताप यांना चौकशीसाठी बोलावले होते. त्यावेळेस गिरवले आणि त्यांच्या साथिदारांनी पोलीस अधीक्षक कार्यालयावर हल्ला करून आमदार जगताप यांना पळवून नेल्याचा आरोप आहे.