कल्याण - डोंबिवली महापालिकेच्या क्षेत्रात लसीकरणाला पुन्हा ब्रेक
कोरोनाचा (Coronavirus) प्रादुर्भाव होत असल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे. तर दुसरीकडे लस नसल्याने चिंता अधिक वाढली आहे.
डोंबिवली : कोरोनाचा (Coronavirus) प्रादुर्भाव होत असल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे. तर दुसरीकडे लस नसल्याने चिंता अधिक वाढली आहे. कल्याण - डोंबिवली महापालिकेच्या (Kalyan - Dombivali Municipal Corporation) क्षेत्रात लसीकरणाला पुन्हा ब्रेक लागला आहे. लसींचा तुटवडा जाणवत आहे. नऊ केंद्रावर लसीकरण सुरु आहे. आज दुपारपर्यंत पुरेल इतका साठा शिल्लक होता. त्यामुळे लसीकरण केंद्रावर एकच गर्दी दिसून आली आहे. मात्र, अनेक केंद्र बंद असल्याने नागरिकांकडून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
लसींचा तुटवडा असल्याने आज केडीएमसीमधील महापालिकेच्या 17 मधील केंद्र 9 केंद्रावर पहिला डोससाठीचे लसीकरण सुरु आहे .मात्र अवघे लसचा 1800 चा साठा असल्याने दुपारनंतर लसीकरण ठप्प होणार आहे .अवघी 9 केंद्र सुरू असल्याने सुरू असलेल्या प्रत्येक लसीकरण केंद्रावर नागरिकांची एकच गर्दी पाहायला मिळत आहे तर काही लसीकरण केंद्र बंद असल्याने नागरिकांना परत जावं लागल्याने संताप व्यक्त केला.
शुक्रवारी लसींचा साठा संपल्याने केडीएमसीला लसीकरण मोहीम बंद ठेवावी लागली मात्र, रविवारी पुन्हा 13 हजार लसीचा साठा पुरवण्यात आल्याने दोन दिवस 17 केंद्रावर लसीकरण होते तर काही खासगी केंद्रवर दुसरा डोस दिला जात होता. मात्र आज पुन्हा एकदा लसींचा साठा संपल्याने आज 9 केंद्र होती. उर्वरित केंद्र बंद ठेवण्यात आली आहे. केडीएमसीच्या आरोग्य विभागाकडून लसींची मागणी करण्यात आली असल्याचे सांगण्यात आले आहे. 1 मे रोजी 18 वर्ष पुढील सर्वांना लसीकरण करण्यात येणार आहे मात्र आताच लसींचा तुटवडा जाणवू लागल्याने 1 तारखेचा नियोजन कसे करायचे असा प्रश्न आता पालिके समोर आहे.