मुंबई : कल्याण-डोंबिवलीतील कोरोनाग्रस्तांची संख्या कमी होण्याचे नाव घेत नाही आहे. आजही केडीएमसीत ८२९ नव्या कोरोनाग्रस्तांची नोंद झाली आहे. त्यामुळे अॅक्टीव्ह रुग्णांची संख्या आता ७ हजार ३४१वर पोहोचली आहे. गेल्या २४ तासात कल्याण-डोंबिवलीत ३ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गेल्या आठवड्याभरापासूनच कल्याण-डोंबिवलीत कोरोनाचा कहर वाढू लागलेला आहे. दररोज वाढणाऱ्या कोरोना रुग्णांची संख्या ही ५०० ते ६०० वर असते. 


आठवड्याभरातील कल्याण-डोंबिवलीतील रुग्णसंख्या


तारीख नवे रुग्ण
२० मार्च, २०२१ ५९१
२१ मार्च, २०२१ ६५१
२२ मार्च, २०२१ ६८६
२३ मार्च, २०२१ ७११
२४ मार्च, २०२१ ८८१
२५ मार्च, २०२१ ९८७
२६ मार्च, २०२१ ८२५
२७ मार्च, २०२१ ८२९

 


कोरोनाच्या या वाढत्या प्रादुर्भावामुळे कल्याण-डोंबिवलीत शनिवार-रविवार अत्यावश्यक सेवा वगळून सर्व दुकाने बंद राहणार आहेत. भाजी मंडईही ५० टक्के क्षमतेने सुरू राहणार आहे. तसेच हॉटेल-रेस्टॉरंटमध्येही केवळ पार्सल सुविधा सुरू राहणार आहे. याशिवाय हॉटेल-रेस्टॉरंटच्या सर्व कर्मचाऱ्यांना कोरोनाची चाचणी करणे बंधनकारक करण्यात आले आहे.