कल्याण : कल्याण पश्चिमेतून एक धक्कादायक घटना समोर येत आहे. या ठिकाणी गोल्डन पार्क परिसरातल्या एका चायनीज हॉटेलमध्ये सिलेंडरचा स्फोट झाल्याचे समोर आले. ही घटना नेमकी कशी घडली यासंदर्भातील वृत्त अद्याप स्पष्ट झाले नाही. या स्फोटामध्ये अग्निशमन दलाच्या एका कर्मचाऱ्याचा दुर्देवी मृत्यू तर एक जण गंभीर झालाय.  मध्यरात्री १ वाजून १० मिनिटांनी स्फोटाचा मोठा आवाज झाल्याने परिसरात भितीचं वातावरण पसरलं. सुरक्षेच्या कारणासाठी विद्युत पुरवठा खंडीत करण्यात आला. अग्निशमनदलाचे कर्मचारी जगदीश आमले यांचा जागीच मृत्यू झाला तर संदीप पालवे हे गंभीर जखमी झाले. 


घटनेची चौकशी 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 याप्रकरणाचा एक व्हिडिओ समोर आला असून त्यामध्ये स्फोटाचा आवाज स्पष्ट ऐकू येतोयं. हे चायनीज दुकान कोणाच्या मालकीचं होतं ? त्यांनी अग्निसुरक्षेचे नियम पाळले होते का ? याची चौकशी करण्यात येत आहे.


आग आटोक्यात आणली असली तरीही अग्निशमन कर्मचाऱ्याच्या मृत्यूमुळे हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.