अतीश भोईर, झी मीडिया


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

Kalyan Crime News: रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येलाच कल्याणमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. भावा-बहिणीने शेजारी राहणाऱ्या अल्पवयीन मुलीसोबत अश्लील कृत्य केले आहेत. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे. 


रक्षाबंधन हा भावा-बहिणीच्या पवित्र नात्याचा सण आहे. यादिवशी बहिणी भावाच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करतात तर भाऊ बहिणीच्या रक्षणाचे वचन देतो. खरंतर आयुष्यात भाऊ किंवा बहिण असणे महत्त्वाचे असते. चुकीच्या मार्गाने जात असताना भावाला योग्य मार्गावर आणण्याची जबाबदारी बहिणीची असते. मात्र, कल्याणमध्ये घडलेल्या घटनेत बहिणीनेच भावाच्या चुकीच्या कामात साथ दिली आहे. 


कल्याण पूर्व येथे हा प्रकार समोर आला आहे. घराशेजारी राहणारी 12 वर्षीय मुलगी घरासमोरील अंगणात खेळत असताना तिला जवळ बोलवून तिच्यासोबत अश्लील चाळे केले.  भावा- बहिणीने दोघांनी मिळून परिसरात राहणाऱ्या बारा वर्षीय अल्पवयीन मुलीसोबत अश्लील चाळे केल्याचे उघड झाले आहे. धक्कादायक म्हणजे, भाऊ पीडित मुलीसोबत अश्लील चाळे करत असतानाच ही विकृत घटना बहिण मोबाईलमध्ये चित्रीत करत होती. भावाच्या या विकृत घटनेचा व्हिडिओ तिने बनवला होता. 


पीडित मुलीने ही बाब धाडस करत घरी सांगितली. त्यानंतर तिच्या कुटुंबीयांनी पोलिसांत धाव घेत घडलेला प्रकार सांगितला. कुटुंबीयांच्या तक्रारीनंतर कोळसेवाडी पोलिसांनी याप्रकरणी दोघांविरोधात गुन्हा दाखल करत त्यांना अटक केली आहे. अजय थापा आणि सपना थापा  असे अटक दोघांचे नाव आहे. पण या घटनेमुळं परिसरात एकच खळबळ उडाली आहे.


धाराशिवच्या प्रेम शिंदेची आत्महत्या की हत्या?


धाराशिवमध्ये अध्यात्मिकतेचे शिक्षण घेणाऱ्या 14 वर्षीय प्रेम शिंदे या विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे वृत्त समोर आले होते. यामुळे धाराशिव तालुक्यातील खळबळ माजली होती. ही आत्महत्या नसून शिक्षकांनी केलेल्या मारहाणीला कंटाळून त्याचा मृत्यू झाल्याचा आरोप गावकऱ्यांकडून करण्यात येत आहे. त्यामुळे प्रेम शिंदेच्या मृत्यूबाबत संशय निर्माण झाला असून गावकरी संतप्त झाले आहेत.