Kalyan Railway Station: कल्याण रेल्वे स्थानकात एक खळबळ उडवून देणारा प्रकार घडला आहे. डबा शोधण्याच्या नादात एका महिलेची तिच्या कुटुंबीयांसोबत चुकामुक झाली. त्यामुळं कल्याण रेल्वे स्थानकात प्रवासी महिलेचा एकच गोंधळ पाहायला मिळाला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कल्याण हे जंक्शन असल्याने लोकलसह लांब पल्ल्याच्या गाड्यादेखील या स्थानकात थांबतात. त्यामुळं दादर, ठाणे या स्थानकाबरोबरच कल्याण स्थानकातही मोठी गर्दी असती. एक्स्प्रेस गाड्यादेखील या स्थानकात थांबतात. कधी कधी गर्दी जास्त असल्याने एक्स्प्रेस पकडण्यात अडथळे यातात. असाच एक प्रकार या महिलेसोबत घडला आहे. 


कल्याण स्थानकात असलेल्या एलटीटी गोरखपूर या एक्सप्रेसमध्ये डबा शोधण्याच्या नादात एका महिलेची तीन वर्षांच्या मुलीची आणि वडिलांची ताटातूट झाली. खूप वेळ शोधल्यानंतरही मुलगी आणि वडिल सापडले नाहीत. महिला रेल्वे स्टेशनवर खूप वेळापासून वडिलांना शोधत फिरत होती. मात्र, खूप शोधूनही दोघे न सापडल्याने घाबरेलल्या महिलेने थेट गाडीची चेनच खेचली. 


महिलेने गाडीची ट्रेन खेचल्यानंतक रेल्वे पोलिसांकडून महिलेला खाली उतरवण्यात आलं. मात्र आपली तीन वर्षांची मुलगी गाडीत राहिली म्हणून महिला आणि तिच्या आईने स्टेशनवर तब्बल अर्धा तास गोंधळ घातला. पोलिसांनी त्या मुलीला आणि तिच्या आजोबाला सामानासकट पुढील स्टेशनवर उतरण्याची व्यवस्था केली. यानंतर पोलिसांनी या महिलांना पोलीस ठाण्यात नेत आपली कारवाई सुरू केली आहे. 


भिवंडीत राहणाऱ्या रूपा सिंह या आपल्या कुटुंबासह गोरखपूरला चालल्या होत्या. त्यासाठी त्या कुटुंबासह कल्याण स्थानकात आल्या होत्या. स्थानकात फलाट क्रमांक चारवर त्यांची गाडी आली. त्यांचे एसी 2चे तिकिट होते. मात्र, हे कुटुंब ज्या ठिकाणी उभे होते तिथे त्यांची बोगी आलीच नाही. त्यामुळं ते बोगीत चढण्यासाठी धावले. रुपा या आपल्या मुलासह आणि आईसह डब्यात चढल्या. मात्र, रुपा यांचे वडिल व तीन वर्षांची मुलगी हे गाडीत चढले की नाही याची त्यांना खात्री नव्हती. 


घाबरेलल्या रुपा यांनी ट्रेनची चेन खेचली. चेन खेचल्यानंतर गाडी थांबली. आरपीएफ कर्मचाऱ्यांनी ट्रेन कोणी खेचली याचा शोध घेतला त्यानेळी रुपा यांना खाली उतरवण्यात आले. त्यावेळी त्यांना जे घडलं ते सांगितलं. गाडी सुरू झाल्यानंतर रुपा यांचे वडिल आणि मुलगीदेखील गाडीत चढल्याचे समोर आले. अखेर महिलेने पोलिसांना त्यांना पुढील स्थानकावर उतरवण्याची विनंती केली.