बालगोपाळांनी साकारल्या चिमुकल्या गणेश मूर्ती...
गणपती उत्सवाची धूम सर्वत्र सुरू आहे. बाप्पाचं आगमन आपल्या घरी होतंय.
कल्याण : गणपती उत्सवाची धूम सर्वत्र सुरू आहे. बाप्पाचं आगमन आपल्या घरी होतंय. कल्याण मधील किड्स वर्ल्ड नर्सरी आणि प्ले ग्रुप च्या चिमुकल्यांनीसुद्धा बाप्पाला तेही त्यांच्यासारख्याच चिमुकल्या बाप्पाला आपल्या घरी आणलाय.
विशेष म्हणजे या मुलांनी हा बाप्पा आपल्या स्वतःच्या हातानी तयार केलाय. शाडूच्या मातीपासून पूर्णपणे नैसर्गिक रंगाचाच वापर करून या मुलांनी आशा छोट्या मुर्ती साकारल्या आहेत.
किड्स वर्ल्ड शाळेच्या शिक्षिकांनी बाप्पा बनवायला या चिमुकल्यांना शिकवलं. बाप्पा प्रत्येक लहानग्यांचा लाडका असतो आणि हाच बाप्पा तोही आपल्या हातांनी बनवलेला घरी आणून बचे कंपनी भलतीच खुश आहे.