Kalyan Crime News : 12 वर्षीय मुलीची एकतर्फी प्रेमातून झाल्याची घटना ताजी असतानाच कल्याण पुन्हा एकदा हादरले आहे. कल्याणमध्ये   अल्पवयीन तरुणावर भर रस्त्यात जीवघेणा हल्ला झाला आहे. आठ  ते दहा जणांच्या टोळक्याने या तरुणाची हत्या केलेय. या घटनेमुळे कल्याण परिसरात कायदा  आणइ सुव्यवस्थेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. 


दोन दिवसात हत्येची दुसरी हत्या


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बुधवारीच कल्याणच्या कोळशेवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका 12 वर्षे अल्पवयीन मुलीची हत्या झाल्याची घटना घडली होती. ही घटना ताजी असतानाच पुन्हा एकदा कल्याण शहर हत्येने हत्येच्या घटनेमुळे हादरले आहे. इथे एका  17 वर्षीय अल्पवयीन मुलाची 8 ते 10 जणांनी एकत्र येऊन बेदम मारहाण करत हत्या केली आहे.


शुक्रवारी सायंकाळी कल्याण पूर्वेच्या खडेगोळवली मंगेशी गार्डन भागात समीरला 8 ते 10 जण मारहाण करत होते. याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले .त्यावेळी मारहाण करणारे पळून गेले, मात्र एक जण पोलिसांच्या तावडीत सापडला.दरम्यान जखमी समीर ला उपचारासाठी रुग्णालयात पाठवले मात्र उपचारा दरम्यान तरुणाचा मृत्यू झाला आहे.  याप्रकरणी कोळशेवाडी पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला .या प्रकरणी दोन जणांना पोलिसांनी अटक केली  असून आणखी दोन आरोपी हे अल्पवयीन आहेत. 


का केली तरुणाची हत्या


मृत तरुणाचे तीन महिन्यापूर्वी आरोपीतील एका अल्पवयीन मुलाला मारहाण केली होती आणि त्याचाच बदला घेण्यासाठी या अल्पवयीन मुलाने आपल्या साथीदारांच्या मदतीने समीरला बेदम मारहाण करत त्याची हत्या केली. समीर हा अल्पवयीन असताना देखील त्याच्यावर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिलीय. मात्र कल्याण पूर्व भागात एका मागोमाग एक हत्येच्या आणि जीवघेणा हल्ला करण्याच्या घटना घडत असताना पोलीस प्रशासन नेमका करताय काय असा सवाल या निमित्ताने उपस्थित होत आहे.


एकतर्फी प्रेमातून 12 वर्षाच्या मुलीची हत्या


कल्याण मध्ये एक तर्फी प्रेमातून अवघ्या 12 वर्ष वय असलेल्या मुलीची हत्या करण्यात आल्याचा प्रकार घडला होता. 17 ऑगस्ट रोजी हा प्रकार उघडकीस आला. धक्कादायक म्हणजे मुलगी ज्या सोसायटीमध्ये राहत होती त्या सोसायटीच्या जिन्यामध्ये तिची चाकूने भोसकून हत्या करण्यात आली. हत्यानंतर कल्याण परिसरातील मुली,तरुणी आणि महिलांमध्ये दहशतीचे वातावरण आहे. शहरात गेल्या आठवड्याभरात गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या अनेक घटना घडल्याने या गुन्हेगारांना कायद्याचा धाक राहिला नाही असंच दिसते आहे.