नाशिक : सकाळ संध्याकाळ शाखेत स्वयंसेवक जातात आणि मंत्रिपदासाठी मात्र नारायण राणे यांना प्राधान्य दिले जाते असा टोला,  विद्यार्थी नेता कन्हैयाकुमार यांनी भाजपला लगावला. नाशिकमध्ये आयोजित कार्यक्रमात कन्हैयाकुमार कुंभनगरीत आले होते. वर्तमान काळातल्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करण्यासाठी इतिहास बदलला जात असल्याची टीकाही त्यांनी या निमित्ताने केली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

छात्रभारती संघटनेने नाशिक येथे आयोजित केलेल्या 'संविधान जागर' सभेत कन्हैयाकुमार यानी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारच्या धोरणांवर कडाडून हल्लाबोल चढवला. यावेळी महागाईवर मोदी सरकारला झोपडले. 'मला सांगा, महागाई वाढली आहे की नाही,' असा सवाल करत 'अच्छे दिन', 'नोटाबंदी' आणि जीएसटीवर हल्ला चढवला. 


टॉमेटोचा भाव २०० रुपये प्रति किलो झालेत. असे सांगत महागाईच्या प्रश्नाला हात घातला. नोटाबंदीमुळे ३ लाख कोटी रुपये इतका काळा पैसा परत आला, असे जर मोदी सांगत असतील तर त्यांच्यावर बुलेट ट्रेनसाठी जपानकडून कर्ज का घेतले, असा सवाल करत नोटाबंदीवर हल्लाबोल चढवला. जीएसटी हा केवळ छोटे आणि मध्यम व्यापारी, शेतकरी, कामगार आणि श्रमिकांना उध्वस्त झाल्याचा आरोप केला.


मोदी भक्तांना आपण भक्त मानत नाही, याचे कारण म्हणजे भक्त हे देवाचे असतात, सैतानाची भक्ती केली जाते का, असे सांगत कन्हैया कुमारनी मोदी यांना अप्रत्यक्षपणे सैतान असे संबोधले.