विकास भोसले, झी मीडिया, सातारा : जागतिक वारसा लाभलेलं कास पठार सध्या विविध फुलांनी सजलंय..गेंद,तरडा, तृण, कंद, वेली, ऑर्किड फुलांचा हंगाम सुरू झाल्यानं पर्यटकांची पावलं कास पठाराकडे वळू लागलीयत. चला तर मग आपणही जवूयात कास पठारचं ह निसर्ग सौंदर्य बघायला..


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

निसर्गाचा अद्भुत नजारा इथं दिसतो... ही दुनिया आहे फुलांची... रंगीबेरंगी रानफुलांची... अनोख्या नवलाईची... हे आहे व्हॅली ऑफ फ्लॉवर्स... म्हणजेच कास पठार...


आंतरराष्ट्रीय जैवविविधता तसंच दुर्मिळ फुलांमुळे जगाच्या नकाशावर कास पठाराची ओळख निर्माण झालीय. कास पठारावर तुरळक प्रमाणात फुलं उमलण्यास सुरूवात झालीय. नयनरम्य फुलांना पाहण्यासाठी पर्यटकांची इथं मोठ्या प्रमाणावर गर्दी होते. 


सातारा जिल्ह्यातील कास पठाराचा युनेस्कोनं जागतिक नैसर्गिक वारसा स्थळ म्हणून समावेश केलाय. कास पठारावर साडेआठशेच्या जवळपास वनस्पती आढळून येतात... त्यातल्या तब्बल 39 प्रजातींचा रेड डाटा बुकमध्ये समावेश आहे. या मोसमात विविधरंगी दुर्मिळ फुलांचं हे दृष्य पर्यटकांना आकर्षित करतात. 


दररोज याठिकाणी दोन हजार पर्यटकांना कास पठाराचा अनुभव घेता येणार आहे. कास पुष्प पठाराला भेट देण्यासाठी तुम्ही ऑनलाईन बुकिंगही करु शकता...तेव्हा या सीझनमध्ये कासला जाण्याचा प्लान नक्की करा.