मुंबई : ओव्हर हेड वायर दुरूस्त करणारी व्हॅन रुळावरून घसरल्यानं कसारा-आसनगाव दरम्यान वाहतूक ठप्प आहे. कसारा स्टेशनजवळ ही घटना घडलीय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरम्यान, लोकोमोटिव्ह दुरुस्ती इंजिनच रुळावरून घसरल्याने नाशिकची पंचवटी आणि मनमाड - मुंबई राज्यराणी एक्सप्रेस तसंच मनमाड - एलटीटी गोदावरी एक्सप्रेस रद्द करण्यात आल्यात. यामुळे लांब पल्ल्याच्या या गाड्यांमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे हाल सुरू आहेत.


मुंबई - नांदेड एक्सप्रेस दौंडमार्गे तर सुपर काशी, पुष्पक एक्सप्रेस सूरतमार्गे वळवण्यात आल्यात.


मध्य रेल्वेमार्गावर मुंबईकडे जाणाऱ्या अनेक एक्स्प्रेस रस्त्यात थांबवाव्या लागल्यात. हे इंजिन रुळावरून लवकरात लवकर हटविण्याच काम सकाळपासून सुरू आहे. 


लोकल वाहतूक ठप्प असल्यानं सकाळीच वासिंदमध्ये रेल-रोको आंदोलनही करण्यात आलंय. वाहतूक ठप्प असल्यानं कसाऱ्याकडून येणाऱ्या प्रवशांचे हाल होत आहेत. दरम्यान, या आंदोलनामुळे रेल्वे प्रशासनानं लोकल वाहतूक टिटवाळ्यापर्यंतच सुरू असल्याचं म्हटलंय.