Pune Gram Panchayat Election Result 2022 : राज्यभरात आज निवडणुकांचे निकाल समोर येत आहेत. अनेक मातब्बरांना या निवडणुकीमध्ये अपयश आल्याचं दिसून आतापर्यंतच्या निकालावरून दिसत आहे. मतदारांनीही एक मतानेही सत्ता पलटू शकते हे दाखवून दिलं आहे. (Grampanchayat Election Result Bhor) दोन ठिकाणी एका मताने दोन उमेदवारांचा पराभव झाल्याचं समोर आलं आहे. (Maharashtra Political News) विजयी उमेदवार दोन्ही राष्ट्रवादीचे असून यामध्ये पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यामधील कासुर्डी गु. मा. गावातील अजय मालुसरे आणि कोल्हापूरमधील दक्षिणमधील वडकशिवालेचे राष्ट्रवादीचे जयवत शिंदे पाटील यांनी 1 मताने विजय मिळवला आहे. (Gram Panchayat Election Result in Marathi)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राष्ट्रवादीच्या अजय मालुसरे यांना 373 मते तर काँग्रेसच्या परशुराम मालुसरे यांना 372 मते मिळालीत. केवळ एका मताने सत्तापरिवर्तन पाहायला मिळाले आहे. परशुराम मालुसरे यांचा अवघ्या 1 मताने पराभव झाला आहे. या निकालाच सर्व तालुक्यामध्ये चर्चा असलेली पाहायाल मिळत आहे. 


निकाल समोर आल्यानंतर दोन्ही गट आमनेसामने होते. आधी बाचाबाची झाली त्यानंतर गटातील समर्थक एकमेकांना भिडले. पोलीस स्टेशमनमध्ये तक्रारी करण्यात आल्या असून गावामध्ये तणावाचं वातावरण आहे. पोलिसांनी संघर्ष वाढू नये म्हणून कडकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. 


दरम्यान, भोर तालुक्यातील एकूण 54 ग्रामपंचायतींपैकी 23 ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या होत्या. त्यामुळे त्या 23 ग्रामपंचायती कोणत्याही पक्षाच्या विचारांच्या म्हणता येणार नाही. कारण सर्व विचारांच्या आणि पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या एकमतानेच ती ठराविक ग्रामपंचायत बिनविरोध होत असते. तसेच 2 ग्रामपंचायतींचे सरपंचपद रिक्त राहिले आहे. एकूण 29 ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाची निवडणूक पार पडली.


दरम्यान, ग्रामस्थांनीही निकालानंतर समाज माध्यमावर व्यक्त होताना काळजी घ्या. कोणाचं मन दुखावल जाईल असे पोस्ट नका शेअर करू असं आवाहन पोलिसांकडून करण्यात आलं आहे.