मराठवाड्यात चांगला पाऊस व्हावा म्हणून कावड यात्रा
मराठवाड्यात चांगला पाऊस व्हावा यासाठी औरंगाबादमध्ये कावड यात्रा काढण्यात आली. हर्सूलच्या हरीसिद्धी माता मंदिरापासून या यात्रेला सुरुवात झाली. हजारो नागरिकांनी पावसासाठी महादेवाला साकडं घातलं.
औरंगाबाद : मराठवाड्यात चांगला पाऊस व्हावा यासाठी औरंगाबादमध्ये कावड यात्रा काढण्यात आली. हर्सूलच्या हरीसिद्धी माता मंदिरापासून या यात्रेला सुरुवात झाली. हजारो नागरिकांनी पावसासाठी महादेवाला साकडं घातलं.
खांद्यावर कावड घेत पाण्याने खडकेश्वरच्या महादेव मंदिरात महादेवाला अभिषेक घातला. यासाठी जवळपास 210 फूट लांब कावड तयार करण्यात आली होती. या यात्रेत खासदार चंद्रकांत खैरे यांनी सहभाग घेऊन वरुणराजाला साकडं घातलं. ही यात्रा कुठल्या एका जाती धर्माची किंवा पक्षाची नसून पावसासाठी नागरिकांनी काढेली यात्रा असल्याचं आयोजकांनी सांगितलं आहे.
पाहा व्हिडिओ