आतिष भोईर, कल्याण : कोरोना रुग्णांच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे कल्याण-डोंबिवली महापालिका सतर्क झाली आहे. शहरातील हॉटेल ,मॅरेज हॉल मालक आणि व्यापारी संघटनांना आयुक्तांनी इशारा दिला आहे. नियमांच पालन करा अन्यथा कारवाई अटळ असल्याचा इशारा आयुक्त डॉ विजय सूर्यवंशी यांनी दिला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबई पाठोपाठ कल्याण-डोंबिवलीत देखील कोरोनाचा हॉटस्पॉट ठरली होती. मात्र ऑगस्ट पासून कोरोनाला थोपवण्यात महापालिकेला यश आलं. पण आता गेल्या काही दिवसात कोरोनाचा आकडा पुन्हा एकदा वाढू लागला आहे. आहा महापालिका हद्दीत 128 रुग्ण आढळले आहेत. राज्यात मुंबईसह अनेक शहरात कोरोना रुग्ण संख्येत वाढत होत असल्याने प्रशासन अलर्ट आहे.  


गेल्या दोन दिवसात कल्याण डोंबिवलीत शहरात कोरोना रुग्णामध्ये काही प्रमाणात वाढ झाली. या वाढत्या रुग्ण संख्येमुळे महापालिका प्रशासन सतर्क झालं असून माक्स न वापरणाऱ्या विरोधात सुरुअसलेली कारवाई आणखी कडक केली जाणार आहे ,सोशल डिस्टसिंगच्या नियमांचे पालन होत नसल्याचे निदर्शनास आल्याने याबाबत  पालिकेने व्यापारी संघटना, हॉटेल संघटना, मॅरेज हॉलच्या मालकांना नियमांचे सक्तीने पालन करण्याच्या सूचना दिल्या आहेत .तसंच या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या विरोधात कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे देखील आयुक्तांनी म्हटलं आहे. यासाठी महापालिका पथके नेमणार असल्याचे देखील आयुक्तांनी सांगितले आहे.