आतिश भोईर, कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिका कोरोनाचा हॉटस्पॉट बनला असून दररोज जवळपास 500 नव्या रुग्णाची नोंद होत आहे. कोरोनाचा हा कहर रोखण्यासाठी शासनाने आखून दिलेल्या नियमांचे पालन करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. मात्र तरीही अनेकजण विनामास्क फिरताना आढळत असून पालिका प्रशासनाकडून नियम मोडणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला आहे तर नागरिकानंतर आता शहरातील दुकानदारनकडेही महापालिकेने आपला मोर्चा वळवला आहे.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कारवाईंसाठी भरारी पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. दोन दिवसापासून ही कारवाई तीव्र करण्यात आली असून काल एका दिवसात मास्क न वापरणाऱ्या नागरिकाकडून तब्बल 2 लाखांचा दंड वसुली करण्यात आली आहे. आज महापालिका आयुक्त डॉ विजय सूर्यवंशी व पोलीस उपायुक्त विवेक पानसरे स्वतः रस्त्यावर उतरून कारवाईत सहभागी झाले होते. 


बाजारपेठेत मास्क, सॅनिटायझर न वापरणाऱ्या दुकानदारांची झडती घेत कारवाई केली गेली. यावेळी आयुक्त डॉ विजय सूर्यवंशी यांनी मास्क आम्हाला दाखवण्यासाठी घालु नका, आपल्या सुरक्षिततेसाठी मास्क वापरा. संसर्ग वाढतोय, मास्क घातल्या शिवाय घराबाहेर पडू नका, ज्या दुकानात मास्क घालत नसतील त्या दुकानात जाऊ नका असे आवाहन करण्यात आले आहे.