केडीएमसीच्या माजी महापौरांचं स्वाईन फ्लूने निधन
गेले १५ दिवस त्या स्वाईन फ्लूने आजारी होत्या.
कल्याण : केडीएमसीच्या माजी महापौर कल्याणी पाटील यांचे स्वाईन फ्लूने निधन झाले आहे. ठाण्याच्या खाजगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. २०१३ ते १५ दरम्यान त्या केडीएमसीच्या महापौर होत्या. गेले १५ दिवस त्या स्वाईन फ्लूने आजारी होत्या. त्यांच्यावर उपचार सुरु होते. अखेर आज त्यांची प्राणज्योती मावळली.
कल्याण-डोंबिवली महापालिका २०१५ सालच्या निवडणुकीत त्यावेळच्या केडीएमसीच्या शिवसेनेच्या महापौर कल्याणी पाटील यांना पराभवाचा धक्का बसला होता. भाजपाच्या सुमन निकम यांच्याकडून केवळ ५० मतांनी त्यांचा पराभव झाला होता. कल्याणी पाटील या सोशल मीडियाचा वापर प्रभावीपण करत.