कल्याण : कल्याण डोंबिवली महापालिकेच्या आरोग्य विभागातील एका डॉक्टरला कोरोनाची लागण झाल्यानंतर त्यांच्या संपर्कातील २२ जणांचे स्वॅब घेण्यात आले होते. त्याचा अहवाल शुक्रवारी प्राप्त झाला. २० जणांचे अहवाल निगेटीव्ह आले असून उपायुक्त दर्जाच्या अधिकारी आणि एका शिपायाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे आता अधिकारी व कर्मचारी कोणा-कोणाच्या संपर्कात आले आहेत याचा शोध सुरू झाला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

महापालिकेच्या मुख्यालयात कोरोनाचा शिरकाव झाल्याने पालिकेच्या चिंतेत अधिकच भर पडली आहे. याआधी रूक्मिणीबाई रूग्णालयातील भूलतज्ञाची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती. मात्र त्यांच्या संपर्कातील लोकांचा अहवाल निगेटीव्ह आल्याने दिलासा मिळाला आहे.


कल्याण-डोंबिवलीत गुरुवारी कोरोनाचे 29 रुग्ण वाढले होते. त्यामुळे एकूण रुग्णांची संख्या 911 वर पोहोचली होती. कल्याण-डोंबिवलीत कोरोनाच्या रुग्णांची वाढती संख्या चिंता वाढवत आहे.