लाचखोर अधिकारी संजय घरतकडून तपासात सहकार्य नाही
कल्याण डोंबिवली मनपाचा लाचखोर अतिरिक्त आयुक्त संजय घरत तपासात सहकार्य करत नसल्याचं समोर आलंय.
कल्याण : कल्याण डोंबिवली मनपाचा लाचखोर अतिरिक्त आयुक्त संजय घरत तपासात सहकार्य करत नसल्याचं समोर आलंय. संजय घरत आपल्या दोन मोबाईलचा पासवर्ड एसीबीला देत नसल्याचं एसीबीने कोर्टात म्हटलंय. मोबाईलमध्ये घरतने काही महत्त्वाची कागदपत्र दडवली असल्याची शक्यता आहे. व्हॉईस सँपल आणि मोबाईल पासवर्ड या दोन मुद्द्यांवर एसीबीने घरतची पोलीस कोठडी मागितली, घरत आणि त्याच्या दोन साथीदारांना ३ दिवसांची पोलीस कोठडी दिलीय. चौथा आरोपी नारायण परूळेकरला २८ जूनपर्यंत न्यायालयीन कोठडी देण्यात आलीय.