COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भोसरी : भोसरीतल्या जमीन खरेदी प्रकरणी आज लाचलुचपत प्रतिबंधक खात्यानं माजी महसूल मंत्री एकनाथ खडसेंविरोधात कुठलाही पुरावा नसल्याचं स्पष्ट केलंय. एकनाथ खडसेंनी पदाचा गैरवापर केला नसल्याचं लाचलुचपत प्रतिबंधक खात्यानं अहवालात नमूद केलंय. त्याचप्रमाणे खडसेंनी केलेल्या जमीन व्यवहारानं सरकारी तिजोरीचं नुकसान झाल्याचा आरोपचेही कुठलेही पुरावे नसल्यांच अहवालात नमूद करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी सांगितलंय. याच आरोपांमुळे खडसेंना मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. 


काय म्हणाले एकनाथ खडसे ?
 अहवालानंतर झी 24 तासला दिलेल्या प्रतिक्रियेत सुपारी घेऊन बेछूट आरोप करण्यात आले. त्यात तत्थ नसल्याचं नेहमीच सांगत होतो, पण कुणीच ऐकून घेतलं नाही याचं जास्त दुःख आहे असं खडसेंनी म्हटलं. भोसरीतील जमीनीचा पत्नी आणि जावयाकडून कायदेशीर व्यवहार झाल्याचे त्यांनी सांगितले.  क्लीन चीट मिळाल्याने आनंद झाल्याचेही त्यांनी सांगितले. मंत्रीपद गेल्याचे दुख मला नाही.मंत्रीपदाबाबत पक्ष योग्य तो निर्णय घेईल. आरोपांनी व्यतिथ होऊन मी राजीनामा दिला होता असेही ते म्हणाले. सुपारी घेऊन माझ्यावर बेछुट आरोप केल्याचे सांगत  बहुजन समाजाच्या नेतृत्वाची बदनामी असल्याचे ते म्हणाले.