खंडाळा घाटात मालगाडीचे डबे घसरले; मुंबई- पुणे रेल्वे वाहतूक विस्कळीत
लांब पल्ल्याच्या `या` गाड्या रद्द
मुंबई : शुक्रवारी सुरु झालेला मुसळधार पावसाचं सत्र हे सोमवारीही सुरुच आहे. रविवारी रात्रीपासून पावसाचा जोर वाढल्याचं पाहायला मिळालं. मुंबईसह महाराष्ट्राच्या इतर भागांमध्येही पावसाने चांगलाच जोर धरल्याचं पाहायला मिळालं. एकिकडे पावसाचा जोर वाढत असतानाच खंडाळा घाटात मालगाडीचे डबे घसरल्यामुळे मुंबई- पुणे रेल्वे सेवेवर याचा परिणाम झाला आहे.
मालगाडीचे डबे घसरल्यामुळे अनेक लांब पल्ल्याच्या गाड्या रद्द करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. खंडाळा घाटात असणाऱ्या जांबरुंग- ठाकुरवाडी येथे मालगाडीचे हे डबे घसरले. पहाटे चारच्या सुमारास ही घटना घडली. ज्यामुळे मुंबईहून पुण्याकडे जाणाऱ्या लांब पल्ल्याच्या गाड्या इगतपुरी मार्गाने वळवल्यातच आल्याचं कळत आहे. सध्याच्या घडीला मालगाडीचे हे डबे रुळांवरुन हटवण्याचं काम युद्धपातळीवर सुरु आहे.
खालील रेल्वेगाड्या रद्द
कर्जत ते लोणावळा दरम्यान असलेल्या छोट्या स्थानकादरम्यान ही घटना घडली. या घटनेमुळे मुंबईहून पुण्याला जाणाऱ्या काही रेल्वेगाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.
मुंबई पुणे इंद्रायणी एक्स्प्रेस
मुंबई पुणे इंटरसिटी एक्स्प्रेस
मुंबई पुणे डेक्कन एक्स्प्रेस रद्द करण्यात आल्या आहेत.
पुणे भुसावळ एक्स्प्रेस
पनवेल पुणे पॅसेंजर
पुणे सीएसएमटी डेक्कन एक्स्प्रेस
पुणे सीएसएमटी प्रगती एक्स्प्रेस , या रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. तर, कोल्हापूर कोयना एक्स्प्रेसही मुंबई ते पुणे दरम्यान रद्द करण्यात आली आहे. बऱ्याच रेल्वे गाड्यांचे मार्ग वळवण्य़ाच आले आहेत.