प्रशांत परदेशी, झी मीडिया, धुळे : धुळे जिल्ह्यात गुलाबी थंडी सुरु झाली आहे. राज्यात सर्वाधिक कमी म्हणजेच ९ अंश सेल्सियस थंडी धुळ्यात नोंदवली गेली आहे. गेल्या तीन दिवसांपासून तापमानाचा पार घसरत होता. 


धुळ्यात १० अंश सेल्सियस तापमान


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

धुळ्यात १० अंश सेल्सियस तापमान होते. तर ते आज ९ अंशावर गेले. वाढत्या थंडीमुळे नागरिक चौकाचौकात नागरिक वाफाळलेल्या चहाचा आस्वाद घेत आहेत. त्यासोबत स्वेटर, मफलर, कानटोपी अश्या गरम कपड्यांची खरेदीही वाढली आहे. 


थंडीमुळे मात्र रब्बी हंगामाला मोठी मदत


वाढत्या थंडीमुळे मात्र रब्बी हंगामाला मोठी मदत होणार आहे. धुळ्यात रात्री आठ वाजेपासून थंडीचा तडाखा जाणवू लागला असून सकाळी १० वाजेपर्यंत थंडी जाणवत राहते. 


सातपुड्यातही गुलाबी थंडी


नंदुरबार जिल्ह्यातही थंडीने आपले गुलाबी रंग उधळायला सुरुवात केली आहे. सातपुड्यात गुलाबी थंडी आणि हिरव्यागार डोंगर रांगांमध्ये पर्यटक मनमुराद निसर्गाचा आनंद घेत आहेत.