पुणे : निवडणुकीमध्ये (Gram Panchayat Election) एखादा नेता निवडून आला तर कार्यकर्ते त्यांना खांद्यावर उचलून जल्लोष करतात. महिला निवडून आली तर तिचे पती, भाऊ तिला दोन्ही दोन्ही हाताने उचलून घेतात. मात्र पती निवडून आला म्हणून धाकड पत्नीने खांद्यावर उचलून मिरवणूक काढावी, अशी घटना पुणे (Pune) जिल्ह्याच्या खेड (Khed) तालुक्यातल्या पाळू (Palu Gram Panchayat) गावात घडली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पाळू ग्रामपंचायतीमध्ये (Palu Gram Panchayat) संतोष शंकर गुरव (Santosh Shankar Gurav) यांनी 221 मते मिळवत विरोधी उमेदवारावर 44 मतांनी विजय मिळविला. त्यामुळे त्यांच्या पत्नी रेणुका गुरव (Renuka Guru) यांनी आनंदोत्सव साजरा करताना पतीराजांना थेट खांद्यावर उचलून घेत मिरवणूक काढली.


यंदा कोरोनामुळे जास्त कार्यकर्त्यांना एकत्र जमण्यास बंदी असल्यानं त्या कायद्याच पालन करताना मिरवणुकीचा जल्लोष करण्यासाठी कार्यकर्त्यांपासून ‘फिजिकल डिस्टन्स’ पाळताना रेणुकां यांनी स्वत:च पतीराजांना खांद्यावर घेत आनंद साजरा केला.