न्हावाशेवा : मारामारीचा बदला घेण्यासाठी मित्राच्या डोक्यात हातोडा घालून हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. उरण तालुक्यातील जासई गावात ही घटना घडली. गुलाबचंद महतो (२२) असे मृत तरुणाचे नाव असून  याप्रकरणी आरोपी उपेंद्र कुमार (१४) या अल्पवयीन अटक करण्यात आली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 उपेंद्र आणि गुलाबचंद एकमेकांचे मित्र होते. ते दोघे भाड्याच्या खोलीत एकत्र राहत होते.


उपेंद्र एका गॅरेजमध्ये तर गुलाबचंद महतो हा एका डंपरवर ड्रायव्हर म्हणून काम करत होता. काही दिवसांपूर्वी दोघांमध्ये भांडण झाले होते.


त्यावेळी गुलाबचंदने केलेल्या मारहाणीत उपेंद्रच्या डोक्यात जखम झाली होती. 


लोखंडी हातोड्याचे १०-१५ घाव 


याचा राग उपेंद्रच्या मनात खदखदत होता.  बदला घेण्यासाठी उपेंद्रने खोलीत झोपलेल्या गुलाबचंदच्या डोक्यात १० ते १५ लोखंडी हातोड्याचे घाव घातले.


उरण पोलिसांनी उपेंद्रला अटक केली असून शनिवारी कर्जत येथील बाल न्यायालयात आणले होते. त्याची रवानगी बालसुधाहरगृहात करण्यात आली आहे.