सांगली : देशाच्या स्वातंत्रोत्तर काळानंतर पहिल्यांदाच लोखंडी पिंजऱ्यातील बेमुदत निकाली कुस्तीचा थरार सांगलीत रंगला. पहेलवान किरण भगतने मनजित सिंगला हरवलं, सांगली शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर क्रीडांगणावर ही लोखंडी पिंजऱ्यातील "महाकुस्ती" पार पडली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तुझ्यात जीव रंगला, या मालिकेमुळे प्रसिद्ध झालेला राणा म्हणजेच हार्दिक जोशी देखील उपस्थित होता.



उपमहाराष्ट्र केसरी किरण भगत आणि बेल्जियम मध्ये सराव करणारा भारतीय पैलवान मनजीतसिंग यांच्या मधली ही कुस्ती आकर्षण ठरणार ठकली. पैलवान-कुस्तीप्रेमी संस्थेच्या उदघाटन कार्यक्रमाचे औचित्य साधून या निकाली कुस्तीचं आयोजन करण्यात आलं होतं.