अंबरनाथ : अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक (Nawab Malik) यांनी एनसीबीचे Zonal Director समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांना आव्हान दिल्यानंतर आता भाजपने ठाकरे सरकारला इशारा दिला आहे. समीर वानखेडे यांच्या केसाला जरी धक्का लागला तर महाराष्ट्राची जनता तुम्हाला सोडणार नाही, असा इशारा भाजप नेते किरीट सोमय्या यांनी दिला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अंबरनाथमध्ये एका कार्यक्रमात बोलताना किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी ठाकरे सरकार आणि नवाब मलिक यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. नवाब मलिक नेमके कोणाचे प्रवक्ते आहेत? ते ड्रग्स माफियांचे प्रवक्ते आहेत का असा सवाल किरीट सोमय्या यांन विचारला आहे. 


राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्पष्ट करावं की नवाब मलिक हे शरद पवार यांच्यावतीने बोलतायत की उद्धव ठाकरे यांच्यावतीने बोलतायत. ते ड्रग्स माफियांचे प्रवक्ते झाले आहेत? मुख्यमंत्र्यांनी हे काम त्यांना दिलं आहे का? असा सवाल विचारत सोमय्या यांनी समीर वानखेडे यांच्या केसाला जरी धक्का लागला तरी नवाब मलिक यांची खैर नाही, असा इशाराच किरीट सोमय्या यांनी दिला आहे. 


ड्रग्स माफियांसाठी एवढं, गेले दहा दिवस ठाकरे सरकार बाकी सर्व कामधंदा बंद करुन बसले आहेत. नवाब मलिक कशासाठी करत आहेत हे सर्व, त्यांचे जावई पकडले गेले म्हणून. शरद पवार आणि नवाब मलिक यांच्यात स्पर्धा काय सुरु आहे तर हलका गांजा आणि हर्बल गांजा. हे शरद पवार यांना शोभा देतंय का. एका मराठी ऑफिसरच्या मागे खुनशीपणाने संपूर्ण ठाकरे सरकार लागतंय. तेवढं या घोटाळेबाजांच्या मागे लागा अशी टीकाही सोमय्या यांनी केली आहे.


नवाब मलिक यांना चेतावणी देतोय, जर समीर वानखेडे यांना नवाब मलिकांच्या ड्रग्स माफियांनी हात लावायचा प्रयत्न केला तर मग त्यांनी बघावं, असं सोमय्या यांनी म्हटलं आहे.