कोल्हापूर :  कोल्हापूरच्या महालक्ष्मी देवीच्या मंदिरात होणाऱ्या किरणोत्सव सोहळ्यादरम्यान मंदिरातील पितळी उंबरा, कासव चौक आणि गणेश मंडपात कोणालाही प्रवेश न देण्याचा निर्णय पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीनं घेतलाय. 


31 जानेवारी, 1 आणि 2 फेब्रुवारीला किरणोत्सव


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

किरणोत्सव मार्गात येत असणाऱ्या अडथळ्यामुळं हा निर्णय घेण्यात आला असल्याचं देवस्थान समितीकडून स्पष्ट करण्यात आलंय. वर्षातून दोनदा कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिरात किरणांचा खेळ पहायला मिळतो. 31 जानेवारी, 1 आणि 2 फेब्रुवारीला हा सोहळा पुन्हा भक्तांना पाहाता येणार आहे. 


किरणोत्सव पाहण्यासाठी स्क्रीन लावणार


भक्तांच्या गर्दीमुळं आर्द्रता वाढते आणि त्याचा परिणाम म्हणून किरणांची तीव्रता कमी होते असा निष्कर्ष अभ्यासकांनी काढलाय. भक्तांना किरणोत्सव सोहळ्याचा आनंद लुटता यावा यासाठी मंदिर परिसरात मोठे स्क्रिन लावण्यात येणार असल्याचंही देवस्थान समितीनं जाहीर करण्यात आलंय.