मुंबई : रत्नागिरीत (ratnagiri) रविवारी शिंदे गटाचा पहिला मेळावा पार पडला. एकनाथ शिंदेंच्या (CM Eknath Shinde) नेतृत्वाखालील शिंदे गटातील नेते रामदास कदम (Ramdas Kadam) यांनी दापोली येथील सभेत आपल्या भाषणामधून युवासेनेचे नेते आदित्य ठाकरेंवर (aditya thackeray) जोरदार निशाणा साधला. यावेळी बोलताना रामदास कदम (Ramdas Kadam) यांनी आदित्य ठाकरेंना थेट लग्न करण्याचा सल्ला दिला (aditya thackeray wedding). 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काय म्हणाले रामदास कदम?


"आदित्य ठाकरे हे टुनटुन करत खोके खोके बोलत आहेत, आधी लग्न करून बघा, बायको आल्यावर मग संसार काय असतो ते कळेल. तेव्हा खोके काय ते कळेल, नुसती दाढी वाढवून काय उपयोग," असा टोला रामदास कदम यांनी लगावला. (kishori pednekar slam ramdas kadam on aditya thackeray wedding)


 


शिवसेनेकडून प्रत्युत्तर


मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर (kishori pednekar) यांनी रामदास कदम (Ramdas Kadam) यांनी केलेल्या आरोपांना प्रत्युत्तर दिलं आहे. आमच्या महिलांच्या नजरेतून ते उतरले असे किशोरी पेडणेकर (kishori pednekar) मुंबईत माध्यमांसोबत बोलताना म्हणाल्या.


"1997-98 पासून यांच्या मनात पक्ष फोडण्याची दुही कायम दिसत होती. हे दिसत असतानाही उद्धव ठाकरे यांनी विश्वास टाकला आणि यांनी सगळी पदं बहाल केली. बाळासाहेब ऐकत नाहीत तर वहिणींकडे जाऊन मस्का मारायचे. 12 आमदारांच्या यादीत स्थान मिळावं म्हणून लाळघोटेपणा करणारा हा नेता," असा आरोप किशोरी पेडणेकर यांनी केला.


"आदित्य ठाकरेंच्या लग्नावरुन सांगणारे तुम्ही कोण सांगणारे. आदित्यने लग्न करायचं की नाही हे त्याचे आई-वडील बघून घेतील. तुम्ही त्यावर भाष्य करणारे कोण? अशी किती मुले आहेत जी तिशीनंतर लग्न करतात. तुम्हाला काय करायच?" असा सवाल किशोरी पेडणेकर यांनी केला.