Lok Sabha Election 2024 : दादरमध्ये फ्लॅट, सोलापुरात बंगला; प्रणिती शिंदे कोट्यवधीची मालकिण
सोलापूर लोकसभेच्या महाविकास आघाडीच्या काँग्रेस उमेदवार आमदार प्रणिती शिंदे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी प्रणिती शिंदे यांनी त्यांची मालमत्त जाहीर केली.
Praniti Shinde Property : सोलापूर लोकसभा मतदार संघात महाविकास आघाडीतर्फे काँग्रेसच्या प्रणिती शिंदे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. सोलापूर लोकसभेच्या महाविकास आघाडीच्या काँग्रेस उमेदवार आमदार प्रणिती शिंदे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.सोलापूर लोकसभे मविआच्या काँग्रेस उमेदवार आमदार प्रणिती शिंदेंनी प्रतिज्ञापत्रात त्यांच्याकडे किती मालमत्ता आहे हे जाहीर केले आहे. प्रणिती शिंदे या कोट्यवधीच्या मालकिण आहे.
सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघातून सलग तीनवेळा निवडून आलेल्या आमदार प्रणिती शिंदे यांच्या नावे 2109 मध्ये चार कोटी 79 लाख 27 हजार 210 रुपयांची मालमत्ता होती. तर, 2024 मध्ये त्यांच्या नावे सहा कोटी 60 लाख 70 हजार 402 रुपयांची मालमत्ता, संपत्ती असल्याचे त्यांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना दिलेल्या प्रतिज्ञापत्रातून स्पष्ट होते.
सध्या प्रणिती शिंदे यांच्याकडे 6 कोटी 60 लाख 70 हजार रुपयांची मालमत्ता आहे. 2019 च्या तुलनेत त्यांच्या संपत्तीत पाच वर्षांत एक कोटी 81 लाख 42 हजार रुपयांची वाढ झाल्याचं दिसून आले. विशेष बाब म्हणजे आपल्या नावे एकही दुचाकी, चारचाकी नसल्याचंही त्यांनी त्यात नमूद केले आहे. 2019 च्या तुलनेत त्यांची बँकांमधील ठेवी जवळपास 30 लाख रुपयांनी कमी झाली आहे. तसेच यांच्या नावे कोणत्याही बँकेचं कर्ज नसल्याचे त्यांनी प्रतिज्ञापत्राचत नमूद केले आहे.
प्रणिती शिंदे यांच्याकडे असलेली संपत्ती
दागिने - 300 ग्रॅम
जमीन - 5 एकर 70 गुंठे
शेअरमधील गुंतवणूक - जवळपास 12 लाख रु
बँका - टपालमधील ठेवी 99.51 लाख रुपये
वाहने आणि वैयक्तिक कर्ज नाही
दादर आणि सोलापूर (प्रत्येकी एक) निवासस्थाने
सोलापुरातून माघार घेत एमआयएमचा काँग्रेसला अप्रत्यक्षरित्या पाठिंबा
सोलापुरात प्रणिती शिंदेंची भाजपच्या राम सातपुतेंशी लढत होणार आहे, सोलापुरातून एमआयएमने माघार घेत काँग्रेसला अप्रत्यक्षरित्या पाठिंबा दिलाय. एमआयएमचे अध्यक्ष असुद्दीन ओवेसींच्या आदेशानुसार पक्षाने हा निर्णय घेतला. सोलापुरातून एमआयएमने माघार घेतल्यामुळे याचा फायदा मविआच्या उमेदवार प्रणिती शिंदेंना होणारेय. तर, दुसरीकडे भगीरथ भालके यांनी पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात काँग्रेस उमेदवार प्रणिती शिंदे यांना पाठिंबा दिलाय. यामुळे प्रणिती शिंदे यांना मिळणार मोठी ताकत मिळू शकते. पोटनिवडणुकीत भालके यांनी 1 लाख मते घेतली होती. त्यामुळे याचा फायदा शिंदेंना होणार आहे.