मुंबई : कोकण रेल्वेने गावी जाणाऱ्या गणेशभक्तांना कोलमडलेल्या वेळापत्रकाचा फटका बसला. पाच तास प्रवाशांचा खोळंबा झाल्याने त्यामुळे मनस्थाप सहन करावा लागला.ऐन गणेशोत्सवात गाड्या उशिराने धावत असल्याने प्रवाशांमधून संताप व्यक्त होत आहे. डाऊन मांडवी, डबल डेकर, दुरांतो, हापा, निझामुद्दीन एक्सप्रेस वगळता अन्य गाड्या उशिराने धावत आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गणेशोत्सवाच्या पहिल्याच दिवशी कोकण रेल्वेचे वेळापत्रक पूर्णपणे कोलमडल्याने तीव्र संताप व्यक्त होत आहे. गणेशभक्तांचे प्रचंड हाल होत आहेत. अनेक चाकरमानी गणेशोत्सवासाठी आठ दिवस आधीच कोकणात दाखल झाले आहेत. तर काही चाकरमानी बुधवारी रात्री कोकणात जायला निघाले होते. मात्र कोकण रेल्वेचं वेळापत्रक कोलमडल्यानं त्यांना कोकणात वेळवेर पोहोचता आलं नाही.


कोकणात जाणाऱ्या सर्वच गाड्यांना तुफान गर्दी असल्याने ही चाकरमान्यांचे हाल होत आहेत. ट्रेन बंचिंगमुळे रेल्वेचं वेळापत्रक कोलमडल्याने गाड्या एकामागे एक थांबल्या आहेत. त्यामुळे चाकरमान्यांचा संताप अनावर होत आहे. सावंतवाडी- पुणे दीड तास उशिराने धावत आहे. झाराप- पुणे विशेष साडे तीन तास उशिरा तर मंगलोर-वांद्रे विकली स्पेशल ५ तास उशिरा धावत आहे. तसेच २२६३० तिरुनवेली-दादर साडे तीन तास उशिरा आणि रत्नागिरी-दादर पॅसेंजर २ तास उशिराने धावत आहे.