कोकण रेल्वेची वाहतूक ठप्प
कोकण रेल्वेची वाहतूक ठप्प झालीये. खेडच्या खवटी गावाजवळ रेल्वे रुळावर माती आल्याने रेल्वेची वाहतूक बंद झालीये.
ऱत्नागिरी : कोकण रेल्वेची वाहतूक ठप्प झालीये. खेडच्या खवटी गावाजवळ रेल्वे रुळावर माती आल्याने रेल्वेची वाहतूक बंद झालीये.
रेल्वे रुळावरुन माती हटवण्याचे काम युद्धपातळीवर सुरु आहे. रायगड, रत्नागिरीहून दोन टीम या ठिकाणी दाखल झाल्यात. गेल्या अर्ध्या तासापासून ही वाहतूक बंद आहे. कोकणात जाणाऱ्या अनेक रेल्वे विविध स्थानकांवर उभ्या आहेत.
दरम्यान, रुळावरील ही माती हटवण्यास आणखी अडीच ते तीन तास लागणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आलेय. तसेच या ठिकाणी कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी पोलीस बंदोबस्तही ठेवण्यात आलाय.