Kokan Rain Update :  कोकणात पावसाने धुमशान घातले आहे. रत्नागिरी जिल्ह्यात पावसाचा कहर पहायला मिळत आहे. गुहागरमध्ये मोठा डोंगर खचला आहे.  डोंगर खचून थेट रस्त्यावर आला आहे. निसर्गाचा हा प्रकोप पाहून ग्रामस्थ भयभित झाले आहेत. खरबदारी म्हणून ग्रामस्थांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित करण्यात आले आहे.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गुहागर मधील पाचेरी सडा गावात डोंगर खचला आहे. मुसळधार पावसामुळे डोंगराचा मोठा भाग रस्त्यावर आल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.


मागील आठ दिवसांपासून डोंगर खचण्याचे सत्र सुरूच आहे.  डोंगराच्या बाजूला असलेल्या 9 घरांना दरडीचा धोका निर्माण झाला आहे. धोकादायक वस्तीमधील लोकांचे प्रशासनाकडून बौद्ध विहारमध्ये स्थलांतर करण्यात आले आहे. डोंगर खचल्याने पाचेरी सडा बौद्ध वाडीतील पाण्याची टाकी खचल्याने भर पावसातही ग्रामस्थांचे पिण्याचे पाण्याचे हाल होत आहे.


किल्ले रायगडच्या पायरी मार्गावर दरड कोसळली


किल्ले रायगडच्या पायरी मार्गावर दरड कोसळली. वाळसूरे खिंडी परिसरात ही दरड पडली. मोठमोठ्या दगडांमुळे पायरी मार्गाचं नुकसान झालंय. मागच्या रविवारी रायगड किल्ल्यावर ढगफुटीसारखा पाऊस झाला होता. तेव्हापासून किल्ले रायगडाचा पायरी मार्ग बंद ठेवण्यात आलाय. त्यामुळं मोठा अनर्थ टळलाय. 


मुंबईसह कोकणाला अतिमुसळधार पावसाचा अंदाज


मुंबईत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे...मुंबईसह ठाणे आणि पालघर जिल्ह्यांत आज मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केलाय. मुंबई, पालघर, ठाणे, सिंधुदुर्गला ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय.  तर रायगड, सातारा आणि रत्नागिरी जिल्ह्यासाठी पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आलाय.


रत्नागिरी जिल्ह्यातल्या देवरुख आगारातील एसटी बसला असलेली गळती आणि त्यातून विद्यार्थ्यांना छत्री घेऊन करावा लागत असलेला प्रवास असा व्हिडिओ सध्या समोर आला आहे. देवरुख आगारातून सुटणाऱ्या देवघर गावी जाणाऱ्या एसटी बसचा हा आजचा व्हिडिओ आहे. शनिवार असल्याने मुलं सकाळच्या वेळेला एसटी बस ने प्रवास करत होती. त्यानंतर अचानक पाऊस आला. यावेळी एसटी गळू लागली आणि विद्यार्थ्यांनी चक्क छत्रीचा आधार घेतला.