कोल्हापूर :  पंचगंगा नदीत बस कोसळल्याची दुर्देवी घटना समोर येत आहे. या घटनेत  १२ ठार, ३ जखमी झाले. गणपतीपुळे इथून ही बस पुण्याच्या दिशेने निघाली होती. 


शिवाजी पुलावरून कोसळली 



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 रात्री साडेअकराच्या सुमारास शिवाजी पुलावरून जात असताना ही दुर्घटना झाल्याचं सांगण्यात येत आहे.


मृत्यूमुखी पडलेल्यांमध्ये काही महिलांचाही समावेश आहे असं सांगण्यात येत आहे.


२ तास बचाव कार्य नाही 


एमएच १२ एनएस ८५५६ या नंबरची ही बस होती. घटना घडताच बुधवार पेठेतील स्थानिक मदतीला धावून आले.


त्यांनी अपघातग्रस्तांना जवळच्या रुग्णालयात दाखल केले. २ तास इथे कोणतेच बचाव पथकं पोहोचले नसल्याने मोठा गोंधळ उडाला.