कोल्हापूर : कोरोनामुळे निर्बंध लावण्यात आले होते. मात्र आता हळूहळू हे निर्बंध शिथिल केले जात आहेत. शाळा देखील सुरू झाल्या आहेत. भाविकांसाठी मंदिरं खुली झाली आहेत पण त्यासाठी ई पास लागत असल्याने अजूनही सर्वांना हवं तेव्हा दर्शन घेणं शक्य होत नाही. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आता भविकांसाठी दिलासा देणारी आणि आनंदाची बातमी आहे. कोल्हापुरातील अंबाबाई आणि जोतिबाच्या दर्शनासाठी तुम्ही जात असाल तर आता थेट मंदिरात जाऊन दर्शन घेता येणार आहे.



दर्शनासाठी असलेली ई पासची सक्ती रद्द करण्यात आली आहे. ई पास रद्द होण्यासाठी ग्रामस्थांनी आंदोलन केल्यानंतर अखेर हा देवस्थान समितीने ई पास रद्द करण्याचा निर्णय घेतला.


निर्णयामुळे भक्तांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. तसंच, मंदिराचे सर्व दरवाजे खुले करण्याचा निर्णय देवस्थान समितीने घेतल्याने भाविकांना मोठा दिलासा मिळाला आहे. ई पासची सक्ती रद्द झाल्यानंतर भक्तांनी देखील समाधान व्यक्त केलं.