कोल्हापूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज महाजनादेश यात्रेनिमित्त कोल्हापूर जिल्ह्यात आज आहेत. ही संधी साधत कोल्हापूर शहरात राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने विविध फलक झळकावून सरकारला सवाल कऱण्यात आले. महापूर, कडकनाथ फसवणूक, कांदा आयात, गडकोट किल्ले यांबाबत सरकारला सवाल करण्यात आहे. राष्ट्रवादी युवक काँग्रेसने हे होर्डींग्ज झळकावले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुख्यमंत्र्यांची महाजनादेश यात्रा 'मी परत येतोय' या टॅगलाईन खाली सुरू आहे. त्याचाच आधार घेत 'मी पस्तावतोय' असा उल्लेख या पोस्टरवर करण्यात आला. रात्री लावण्यात आलेले हे पोस्टर पोलिसांनी सकाळी काढून टाकले.



महाजनादेश यात्रेनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. काल इस्लामपूर - सांगली रस्त्यावर मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यावर कडकनाथ कोंबड्या फेकल्याचा प्रकार घडला. भाजपच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन करणाऱ्यांना अडविण्याचा प्रयत्न केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाजनादेश यात्रा कुंडल फाटा येथे पोहोचली असता हा प्रकार घडला.


आंदोलनादरम्यान स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकार्ते आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये झटापट देखील पाहायला मिळाली. कडकनाथ कोंबडी घोटाळ्याची चौकशी करण्याची मागणी हे आंदोलक करत होते. हजारो शेतकऱ्यांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक झाली असून या प्रकरणी पश्चिम महाराष्ट्रातील विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत.