प्रताप नाईक, झी मीडिया, कोल्हापूर : महाराष्ट्रात जादूटोणा कायदा (Witchcraft) अस्तित्वात आला तरी देखील या कायद्याला धाब्यावर बसवून दिवसाढवळ्या करणी, जादूटोणा आणि भानामतीचे प्रकार असताना उघड होत आहेत. कोल्हापूर (kolhapur Crime) जिल्ह्यातील आजरा तालुक्यातील मलिग्रे इथं तर अंधारात करणी करायला निघालेल्या महिलेची ही दृश्ये कैद झाली आहे. आपला पाठलाग कोणीतरी करतोय हे महिलेला माहित असताना देखील रागाच्या भरात करणी करायला निघाली ही महिला पाहिल्यानंतर खरंच जादूटोणा कायद्याची भीती राहिली आहे का याबाबत शंका येत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आपल्या मुलीचे तिच्या प्रियकरासोबत लग्न होवू नये म्हणून जादूटोणा करणाऱ्या आई वडील आणि आणखी दोघांविरोधात कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा पोलिसांत गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सगळ्यात धक्कादायक बाब म्हणजे मुलीची आई करणी करण्यासाठी जात असताना हा सगळा प्रकार मोबाईल शूट करण्यात आला आहे.


आजरा तालुक्यातील मलीगडे इथले रहिवासी रेश्मा बाबुराव बुगडे आणि शामराव दत्तू बुगडे या दोघांनी मिळून आपल्या मुलीचे प्रियकरा सोबत लग्न होऊ नये यासाठी भर अंधाऱ्या रात्री हातात भोंदू बाबांचे साहित्य घेऊन रस्त्याकडेला करणी केली. करणीचा हा सर्व प्रकार प्रियकराच्या संबंधित व्यक्तीने मोबाईलवर चित्रित केला. सगळ्यात धक्कादायक म्हणजे आपला पाठलाग कोणीतरी करतय हे मुलीची आईला माहीत असताना देखील तिने करणी केली आणि त्यानंतर परात जात असताना दुचाकी वरून पाठलाग करणाऱ्या व्यक्तीच्या गाडीवर खुरपे मारून निघून गेली. या प्रकारानंतर आजरा पोलिसात रेश्मा बाबुराव बुगडे , शामराव दत्तू बुगडे , सुनील बाबू निमगरे व भोंदू बाबा विरोधात पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे. याबाबत प्रियकर राहुल पवार यांने फिर्याद दिली आहे.


 



फिर्यादी राहुल पवार, रेश्मा बुगडे , शामराव बुगडे हे एकाच गावातील रहिवासी आहेत. राहुल याचे बुगडे यांच्या मुलीबरोबर प्रेम संबंध आहेत. याची सर्व माहिती दोन्ही कुटुंबातील लोकांना माहिती होती. त्यामुळे राहुलने गावातील प्रतिष्ठित व्यक्तींनासोबत घेवून लग्नाची मागणी घालण्यासाठी बुगडे दांपत्याच्या घरी गेले होते. त्यावेळी बुगडे यांनी राहुल याला अपमानास्पद वागणूक देऊन लग्नाला नकार दिला. त्यानंतर बुगडे दाम्पत्यांनी 29 सप्टेंबर रोजी भोंदू बाबाच्या मदतीने रात्री साडेनऊ वाजता स्मशानभूमी परिसरात जाऊन करणी केल्याचे उघड झाले. करणी केलेल्या ठिकाणी प्रियकर आणि मुलीचा फोटो, लिंबू व चंदेरी रंगाचा कागद असे साहित्य पुरून त्यावर एक अंडे दारू ठेवल्याचे निदर्शनास आले. याप्रकरणी आजरा पोलिसांनी चौघा विरोधात गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी खडक कारवाई करावी असं अनिसंने मागणी केलीय.