प्रताप नाईक, झी मीडिया, कोल्हापूर : छत्रपती शाहू महाराजांच्या कोल्हापूर नगरीत चाललंय काय? असा प्रश्न उपस्थित होतोय. हा प्रश्न उपस्थित होण्याचं कारण म्हणजे एक धक्कादायक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोल्हापुरातील तरुण मंडळाच्या धार्मिक कार्यक्रमात अश्लील हावभाव असलेला डान्स व्हायरल झाला आहे. या डान्सच्या ठिकाणी काही तृतीयपंथीय महिला आणि इतर सिगारेट सुद्धा उघडपणे ओढत असताना दिसून येत आहेत. मिरवणूकीत डिजेच्या तालावर मुली आणि तृतीयपंथी अश्लिल भाव करत डान्स करत होत्या. इतकंच नाही तर त्या खुलेआम सिगारेटही ओढताना दिसताय.


कोल्हापूरात गेल्या काही वर्षात जत्रांमध्ये अशा प्रकारे मुलींना नाचवण्याच प्रकार वाढले आहेत.  कोल्हापुरातील लक्ष्मीपुरी पोलीस काय करत होते, असा सवाल कोल्हापुरातील शिवसैनिकांनी उपस्थित केलाय. 



त्याचबरोबर शिवसैनिकांनी लक्ष्मीपुरी पोलीस स्टेशन मध्ये धाव घेत धार्मिक कार्यक्रमात अश्लील हावभाव आणि उघडपणे धूम्रपान आणि त्याचबरोबर गांजाचा वापर झाला आहे, त्यामुळे या प्रकरणी गुन्हा दाखल करून कारवाई करावी अशी मागणी केलीय. ही मागणी करत असताना तालीम मंडळाला दोषी न धरता ज्यांनी ही कृती केलीय त्याच्यावरच गुन्हा दाखल करावा अस शिवसैनिकांनी म्हटलंय.


अशी कृत्य खपवून घेणार नसल्याचा इशाराही शिवसेनेने दिला आहे.