कोल्हापूर :  महाराष्ट्राचं मिनी मॅन्चेस्टर आठ दिवसांपासून ठप्प आहे. मजुरीत प्रतिमीटर ९ पैसे वाढीची कामगारांची मागणीसाठी हे आंदोलन सुरु आहे. आपल्या मागणीसाठी इचलकरंजीत यंत्रमाग कामगारांनी भव्य मोर्चा काढलाय.


कामगारांनी मजुरीवाढीची मागणी


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 मिनी मॅचेस्टर अशी ओळख असणा-या इचलकरंजी शहरातील यंत्रमागधारक कामगारांनी मजुरीवाढ मिळावी या मागणीसाठी गेल्या आठ दिवसापासून कामबंद आंदोलन पुकारलंय. त्यामुळं वस्त्रनगरी इचलकरंजीमधील शंभर कोटी रुपयाहून अधिक उत्पादन ठप्प झालाय.


करारानुसार प्रति मिटर ९ पैसे हवे


इतकचे नव्हे तर कामगार आणि यंत्रमागधराक याचं कोट्यावधी रुपयाचं नुकसान देखील होतय. आज कामगारांनी आपल्या मागण्यासाठी प्रांत कार्यालयावर मोर्चा काढला आहे. यंत्रमाग मालक आणि कामगार संघटना यांच्यामध्ये  २०१३ मध्ये झालेल्या करारानुसार प्रति मिटर ९ पैसे मजुरीवाढ मिळावी या मागणीसाठी इचलकरंजी शहरातील यंत्रमाग कामगारांनी बेमुदत काम बंद आंदोलन पुकारलं आहे. 


नोटबंदी, जीएसटीने कंबरडे मोडले


आधीच व्यावसायिक मंदी, त्यात नोटबंदी आणि जी.एस.टीमुळं यंत्रमागधारकाचं कंबरडे मोडलेलं आहे.. त्यात कामगारांनी मजुरीवाढ मिळावी. यासाठी बेमुदत पुकारलेल्या बंदमुळं इचलकरंजीतील व्यवसाय कोलमडलेला आहे.



१ जानेवारीपासून हा बंद सुरु असून आज कामगारांनी इचलकरंजी प्रातं कार्यालयावर मोर्चा काढला आहे. कामगारांच्या कामबंद आंदोलनामुळं कामगाराचं साधारण ५ कोटी रुपयाचं आणि यंत्रमागधारकाचं जवळपास १०कोटी रुपयाचे नुकसान झालंय. 


तोपर्यंत कामबंद आंदोलन 


जोपर्यंत मजुरीवाढ मिळत नाही, तोपर्यंत कामबंद आंदोलन मागं घेणार नाही, अशी भूमिका यंत्रमागधारक कामगारांची आहे. तर यंत्रमाघधारक अडचणीत असल्यामुळं मजुरीवाढ देणं शक्य नसल्याचं यंत्रमागधारकाचं म्हणण आहे.