कोल्हापूर : कोल्हापुरातील हभप इंदुरीकरांचा कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे. आज संध्याकाळी कोल्हापुरात इंदुरीकर महाराजांच्या किर्तनाचा कार्यक्रम होणार होता. या कार्यक्रमाला अंधश्रद्धा निर्मूलन समितीने विरोध केला होता. यामुळे वादंग निर्माण झाला. तर दुसरीकडे हिंदु संघटनांनी कार्यक्रम व्हायला पाहीजे अशी भूमिका घेतली आहे. विरोध आणि समर्थन अशा दोन्ही गोष्टी कोल्हापुरात पाहायला मिळाल्या. हा कार्यक्रम रद्द केला नसून तुर्तास स्थगित केला असल्याचे कार्यक्रमाच्या आयोजकांनी सांगितले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

इंदोरीकर महाराजांबाबत पीसीपीएनडी समिनीने जाणीवपूर्वक दिरंगाई केल्याचा आरोप अंधश्रद्धा निर्मूलन समितीनं केलाय. 15 दिवसात इंदोरीकर महाराजांवर करावी करा अन्यथा जिल्हा शल्य चिकित्सकानांच सहआरोपी करत न्यायालयीन कारवाई करण्यात येईल असं अंनिसच्या रंजना गवांदे यांनी इशारा दिलाय.



अर्ज वजा नोटीस 


कीर्तनकार इंदूरीकर महाराज यांना अहमदनगरच्या पीसीपीएनडी समितीनं क्लीन चीट दिली होती. त्यानंतर आता अंनिसने अहमदनगर जिल्हा शल्य चिकित्सकांना एक अर्ज वजा नोटीस दिलीय. ज्यात पुरावे शोधून इंदुरीकरांवर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आलीय.