छत्रपती संभाजीराजे असं म्हणाले तरी काय? कोल्हापूर लोकसभेचा आखाडा निवडणुकीआधीच चर्चेत
कोल्हापूर लोकसभेची लढत तुल्यबळ होणार हे जवळपास निश्चित झालंय. मात्र त्यात चुरस वाढलीये ती संभाजीराजेंनी केलेल्या वक्तव्यामुळे
Chhatrapati Sambhaji Raje : कोल्हापूर लोकसभेच्या आखाड्यात महाविकास आघाडी कडून उमेदवार कोण ? याची उत्कंठा शिगेला पोहचलीये. त्यातच छत्रपती संभाजीराजे यांनी 2019 च्या जखमा विसरलो नसल्याचं वक्तव्य केलं. त्यामुळे या आखाड्यात आपणही असणार याचे सूतोवाच राजेंनी केलेत.. तर दुसरीकडे सतेज पाटलांनीही लोकसभेसाठी सरप्राईजिंग नाव असू शकतं म्हणत गुगली टाकली आहे.
दोन नेत्यांची वक्तव्य पाहिल्यानंतर कोल्हापूर लोकसभा मतदार संघाची लढत तुल्यबळ होणार हे जवळपास निश्चित मानला जात आहे. सध्या कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात शिंदे गटाचे खासदार संजय मंडलिक हे प्रतिनिधित्व करत आहेत. त्यामुळे कोल्हापूरची जागा शिंदे गटाकडेच राहील हे जवळपास निश्चित मानला जातय.. मात्र दुसरीकडे संभाजी राजे कोल्हापूर लोकसभा निवडणूकीत नेमकं कोणाचं उट्टे काढणार याकडे सर्वांचे लक्ष लागलंय.
कोल्हापूरमधून आगामी लोकसभा निवडणूक लढवण्याचे संकेत संभाजीराजे छत्रपतींनी दिलेत. कोल्हापूर, नाशिक, संभाजीनगर की आणखी कुठून निवडणूक लढवणार ते लवकरच सांगू, असं सूचक वक्तव्य संभाजीराजेंनी केंलय.. 2009ची जखम अजून विसरलेलो नाही, असं त्यांनी सांगितलं. आगामी लोकसभा निवडणुकीत स्वराज्य संघटना मुख्य प्रवाहात असेल, असंही ते म्हणाले.
राज्यातील जागावाटपाबाबत अंतिम निर्णय
14 किंवा 15 जानेवारीला सोनिया गांधी, शरद पवार आणि उद्धव ठाकरेंची बैठक होणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. दिल्लीत महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक होईल. त्यात राज्यातील जागावाटपाबाबत अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे. मविआचं जागावाटप जवळजवळ निश्चित झालं असून वंचितसोबतची चर्चा अंतिम टप्प्यात आली असल्याची माहिती ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी दिलीय. त्यामुळे मविआत प्रकाश आंबेडकरांचं समाधान होणार का? याकडेच राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलंय.
जागावाटपावरुन महायुतीच्या घटक पक्षांमध्ये नाराजी
लोकसभेच्या जागावाटपावरुन महायुतीच्या बैठकीत घटक पक्षांनी नाराजी व्यक्त केल्याची माहिती सूत्रांनी दिली. लोकसभेसाठी किती जागा देणार असा सवाल या बैठकीत घटक पक्षांनी केल्याची माहिती मिळतेय.. मात्र सर्वांच्या सहमतीने अब की बार 45 पार' ची तयारी करत असल्याचा दावा भाजप आमदार प्रसाद लाड यांनी केलाय..
कोल्हापुरात माजी मंत्री सतेज पाटील आणि खासदार धनंजय माहाडिक यांच्यातला वाद विकोपाला
कोल्हापूरचे पारंपरिक राजकीय विरोधक माजी मंत्री सतेज पाटील आणि खासदार धनंजय माहाडिक यांच्यातला वाद विकोपाला गेला होता. सतेज पाटील यांच्या समर्थकांनी राजाराम सहकारी साखर कारखान्याचे एमडी प्रकाश चिटणीस यांना जबर मारहाण केल्यानंतर महाडिकांनी इशारा दिला. मारहाण करण्याचा कट पूर्वनियोजित असून, हल्लेखोरांवर कारवाई करा. नाहीतर आम्ही देखील सक्षम आहोत, आम्ही ठरवू असा इशाराच महाडिकांनी दिलाय. काल कारखान्याचे एमडी गाडीतून जात असताना त्यांना गाडीतून बाहेर काढून लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. हल्लखोर सतेज पाटील समर्थक असल्याचा आरोप करण्यात आलाय...या घटनेनंतर महाडिकांनी जखमी चिटणीस यांची विचारपूस केली. त्यानंतर सतेज पाटलांना इशारा दिला.