कोल्हापूर : कोल्हापूर महापालिकेच्या निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. 21 डिसेंबर रोजी आरक्षण सोडत होणार आहे. कोल्हापूरमध्ये 81 प्रभागात अटीतटीची लढत रंगणार आहे. महाविकास आघाडी विरोधात भाजप अशी लढत होण्याची शक्यता आहे. केशवराव भोसले नाट्यगृह येथे सकाळी 11 वाजता हे आरक्षण सोडत जाहीर होणार आहे. 23 डिसेंबर ते 4 जानेवारी पर्यंत यावर हरकती व सूचना मागवून त्यानंतर अंतिम आरक्षण घोषित होणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

20 नोव्हेंबरला महापालिका सभागृहाची मुदत संपली आहे. गेल्या वर्षी 31 ऑक्‍टोबरला मतदान झाले होते. यंदा कोरोनामुळे महापालिकेची निवडणूक वेळेत होऊ शकलेली नाही. त्यामुळे निवडणूक पुढे ढकलावी लागली. 


महापालिकेत सध्या काँग्रेस राष्ट्रवादीची सत्ता आहे. गेल्या निवडणुकीत भाजप-ताराराणी आघाडीने चांगलं यश मिळवलं होतं. पण सत्तेसाठी काही जागा कमी पडल्या होत्या. आता राज्यात राजकीय स्थिती बदलली आहे. शिवसेना, काँग्रसे आणि राष्ट्रवादी एकत्र आल्यामुळे कोल्हापूर महापालिकेत देखील महाविकासआघाडी एकत्र लढण्याची शक्यता आहे. त्यामुळे भाजप पुढे मोठं आव्हान राहणार आहे.