कोल्हापूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि कोल्हापूर जिल्हा बँकेचे अध्यक्ष हसन मुश्रीफ यांच्या घरावर आयकर विभागाने छापा टाकला. गुरुवारी सकाळपासून त्यांच्या घराची झडती घेण्यात येत आहे. इतकंच नाही तर हसन मुश्रीफ यांच्या कागल इथल्या घरासह साखर कारखाना, त्यांच्या पुण्याच्या मुला-मुलींचे घर आणि कोल्हापुरातील टाकाळा परिसरात राहणारे साडू यांच्या घरावरही आयकर विभागाच्या छापा टाकण्यात आला आहे. 


मुश्रीफ यांचा कागल इथला बंगला

COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हसन मुश्रीफ बुधवारी मुंबईतमध्ये होते. गुरुवारी सकाळीच ते कागलमधल्या आपल्या निवासस्थानी पोहचले. हसन मुश्रीफ हे कागल मतदार संघातून राष्ट्रवादीचे आमदार आहेत.


मुश्रीफ यांच्या या झाडाझडतीनं कोल्हापूर जिल्ह्यात एकच खळबळ उडालीय. उल्लेखनीय म्हणजे, मागच्याच आठवड्यात भाजप नेते आणि पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी हसन मुश्रीफ यांना भाजपामध्ये येण्याचं जाहीर आवाहन केलं होतं... आणि हसन मुश्रीफ यांनी या आवाहनाला धुडकावून लावलं होतं. त्यामुळे, मुश्रीफ यांच्या झाडाझडतीनं सत्ताधाऱ्यांकडून विरोधकांची कोंडी केली जात आहे का? या चर्चेला पुन्हा एकदा सुरुवात झालीय.