कोल्हापूर :  कोल्हापूरकरांवर पुन्हा एकदा टोल संकट घोंघावतंय. आयआरबी कंपनीने कोल्हापूर महापालिकेला थकीत पैसे महिन्याभरात भरण्याचा इशारा दिला आहे. भरले नाहीत तर टोलवसुली पुन्हा सुरू करण्यात येणार असल्याचं या पत्रात म्हटलं आहे. 


आयआरबीला टोलचे पैसे अजून दिलेले नाहीत


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राज्य सरकारने आयआरबीला टोलचे पैसे अजून दिलेले नाहीत. कोल्हापुरातला टोल बंद होऊन 2 वर्ष उलटली, तरी राज्य सरकारने अजून आयआरबीचे पैसे दिलेले नाहीत. कोल्हापूर शहरातील टोलवसुलीला नागरिकांचा प्रचंड विरोध झाला होता. 


यापूर्वी 450 कोटी रूपये देण्याचं कबूल


टोलवसुली बंद पाडण्यासाठी नागरिकांनी आणि विविध संघटनांनी मोठ्या प्रमाणात आंदोलनही केलं होतं. अखेर आयआरबी कंपनीला 450 कोटी रूपये देण्याचं कबूल करून राज्य सरकारने टोल बंद करून घेतला. 


मुख्यमंत्र्यांचा नागरी सत्कारही केला


टोल रद्द झाल्यावर कोल्हापूरकरांनी मुख्यमंत्र्यांचा नागरी सत्कारही केला होता. मात्र आता आयआरबी कंपनीच्या दाव्यानुसार कंपनीला हे पैसे मिळालेले नाहीत. त्यामुळे वसुली पुन्हा सुरू करण्याचं पत्र कंपनीने महापालिकेला दिलं आहे.