कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष, उपाध्यक्षपदासाठी आज निवडणूक होत आहे. सध्या कोल्हापूर जिल्हा परिषदेमध्ये भाजपची सत्ता आहे. पण राज्यात बदललेल्या नव्या राजकीय समीकरणाची मुळे कोल्हापूर जिल्हा परिषदेमध्ये देखील सत्ताबदल होईल असं बोलले जात आहे. भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादी, शिवसेना आणि इतर स्थानिक आघाड्या एकत्र येत आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील हे मात्र जिल्हा परिषदेमधील सत्ता अबाधित राहावी, यासाठी अनेकांच्या भेटीगाठी घेतल्या आहेत.  त्यांना यामध्ये कितपत यश येत याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.


कारण काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या सदस्यांना दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी सहलीवर पाठवलं होत, ते दहा वाजता जिल्हा परिषदेमध्ये दाखल होणार आहेत. 


या निवडीच्या पार्श्‍वभूमीवर काँग्रेसचे नेते मंत्री सतेज पाटील राष्ट्रवादीचे नेते मंत्री हसन मुश्रीफ आणि शिवसेनेच्या इतर नेत्यांची बेळगाव मध्ये बैठक पार पडली आहे. 


67 सदस्यांच्या सभाग्रहात महाविकास आघाडीकडे  40 हुन अधिक सदस्यांचे पाठबळ असल्याचा दावा महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केला आहे.