कोकण रेल्वे आता सुस्साट, 10 क्रॉसिंग स्थानकं
konkan railway : कोकण रेल्वेचा प्रवास आता सुकर होणार आहे. (Konkan Railway Travel ) लांब पल्ल्याच्या गाडयांसाठी क्रॉसिंग स्थानके देण्यात येणार आहेत.
मुंबई / रत्नागिरी : konkan railway : कोकण रेल्वेचा प्रवास आता सुकर होणार आहे. (Konkan Railway Travel ) लांब पल्ल्याच्या गाडयांसाठी 10 क्रॉसिंग स्थानके देण्यात येणार आहेत. गर्दीच्या वेळी मोठ्या संख्येने जादा गाड्या सोडल्यास कोकण मार्गावरची वाहतूक कोलमडते. यासाठी कोकण रेल्वेने क्रॉसिंग स्थानक प्रकल्प राबविला होता. तो पूर्ण झाला आहे. या मार्गावरील लांब पल्ल्याच्या गाड्यांचा वेळ वाचण्यासाठी, नवीन गाड्या सेवेत याव्या यासाठी कोकण रेल्वेने क्रॉसिंग स्थानक प्रकल्प राबवला आणि तो पूर्णत्वाला गेला आहे. त्यामुळे आता गर्दीच्यावेळी सिग्नला गाड्या रखडणार नाहीत. त्यामुळे कोकण रेल्वेचा प्रवास सुकर होणार आहे.
कोकण रेल्वेवर आठ लूप लाईनही सेवेत आल्या आहेत. ऑगस्ट 2021 मध्ये या कामाला सुरुवात झाली आणि हे फेब्रुवारी 2022मध्ये पूर्ण झाले. त्यामुळे कोकण रेल्वे मार्गावर आता अधिक संख्येने गाड्यांना सामावून घेण्यासाठी आणि ट्रेनचे कामकाज सुलभ करण्यासाठी स्टेशन परिसरात लूप लाइन तयार केल्या गेल्या आहेत. ज्यामध्ये अनेक इंजिनांसह पूर्ण लांबीची मालगाडी बसू शकते. दरम्यान, सध्या वीर ते रोहा दरम्यान रेल्वे मार्गाचेच दुहेरीकरण झाले आहे. तसेच कोकण रेल्वे मार्गावर विद्युतीकरणही झाले आहे. त्यामुळे गाड्या या विजेवर धावत आहेत. त्यामुळे गाड्यांचा वेगही वाढला आहे.
ही आहेत नवीन स्थानके
सध्या वीर ते रोहा अशा 46 किलोमीटर मार्गाचेच दुहेरीकरण झाले आहे. रायगड जिल्ह्यात इंदापूर, गोरेगाव रोड, सापे वामने, रत्नागिरीतील चिपळण विभागात कळंबणी, संगमेश्वरमधील कडवई तर लांजा तालुक्यातील वेरवली, राजापूर तालुक्यातील खारेपाटण आदी क्रॉसिंग स्थानके सेवेत आली आहेत.
गणपतीसाठी रेल्वे आरक्षण
कोकणात गणेशोत्सवासाठी चाकरमानी वर्षभरापासून तयारी करत असतात. यंदा गणपती बाप्पचे आगमन 31 ऑगस्टला होणार आहे. यामुळे रेल्वे तिकिटांचे 120 दिवस आधीपासून सुरु होणारे रेल्वे तिकिटांचं आरक्षण एप्रिलअखेरीस सुरु होत आहे.