कोकणात अनधिकृत बोटींचा शिरकाव, मच्छिमारांचा व्यवसाय धोक्यात
अनधिकृत बोटींचा सुळसुळाट झाल्यानं कोकणात स्थानिक मच्छिमारांचा व्यवसाय धोक्यात आलाय.
रत्नागिरी : अनधिकृत बोटींचा सुळसुळाट झाल्यानं कोकणात स्थानिक मच्छिमारांचा व्यवसाय धोक्यात आलाय. बंदरात शेकडो अनधिकृत बोटी दिसत असुनही मस्त्य विभाग कानाडोळा करत असल्याचा आरोप मच्छिमार संघटनांनी केलाय. मत्सविभागाच्या आशीर्वादानंच परराराज्यातल्या २१०० बोटी बिनबोभाट मासेमारी करत असल्याचा आरोपही संघटनेनं केलाय.
सर्वाधिक बोटी रायगड जिल्ह्यात आहेत. तब्बल साडे आठशे बोटी परवान्याशिवाय रायगडच्या किनाऱ्यालगत मासेमारी करतायत. तर रत्नागिरीत ७००, मुंबई २०० आणि सिंधुदुर्गातही १०० अनधिकृत बोटी किनाऱ्याला लागल्यायत. परराज्यातल्या बोटीही मोठ्या प्रमाणात येऊन कोकण किनारपट्टीवर मासेमारी करतायत. मत्स्य विभागाच्या आशीर्वादानं या बोटी किनारपट्टी भागात उभ्या असल्याचा आरोप मच्छिमार नेते करत आहेत.