कोपर्डी बलात्कार घटना : राष्ट्रवादी काँग्रेसकडून राज्यभर मूक मोर्चा
कोपर्डीच्या घटनेला एक वर्ष झालं मात्र अजूनही आरोपींनाशिक्षा झालेली नाही. त्यामुळे आज राष्ट्रवादी काँग्रेसकडून राज्यभर मूक मोर्चा काढण्यात येणार आहे. औरंगाबादमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत सुनील तटकरेंनी ही माहिती दिली.
औरंगाबाद : कोपर्डीच्या घटनेला एक वर्ष झालं मात्र अजूनही आरोपींनाशिक्षा झालेली नाही. त्यामुळे आज राष्ट्रवादी काँग्रेसकडून राज्यभर मूक मोर्चा काढण्यात येणार आहे. औरंगाबादमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत सुनील तटकरेंनी ही माहिती दिली.
शेतकरी कर्जमाफीवरुन त्यांनी भाजप आणि शिवसेनेवर टीका केली. शेतक-यांवर दुबार पेरणीची वेळ आली असताना सरकारनं उपाय योजना करण्याची मागणीही त्यांनी केली आहे.
कोपर्डी सामूहीक बलात्काराच्या घटनेचा आज एक वर्ष पूर्ण होतंय. या घटनेचा राज्यभरातून निषेध झाला. राज्यभर मूकमोर्चे निघाले.. सरकारवर दडपण आलं.. निर्भयाच्या न्यायाच्या मागणीसोबत मराठा आरक्षणाच्या मुद्द्यानं उचल खाल्ली मात्र वर्षभरातच सारं काही थंड झालं.
१३ जुलै २०१६ नंतर कोपर्डी हे गाव अचानक प्रकाशझोतात आलं. त्याला कारणही तेवढंच भयंकर होतं.. देशाला हादरवून टाकणा-या दिल्लीतल्या निर्भया बलात्काराची पुनरावृत्ती नगर जिल्ह्याल्या कोपर्डी या लहानशा गावात घडली... एका अल्पवयीन मुलीवर सामुहिक बलात्कार करुन तीची निर्घृण हत्या करण्यात आली. आणि अवघं राज्य या घटनेनं ढवळून निघालं.