कल्याण : स्मार्टसिटी योजनेंतर्गत कोरियाच्या शिष्टमंडळाने कल्याण डोंबिवली महापालिकेला भेट दिली. यावेळी त्यांनी टाऊनशीपसाठीच्या प्रस्तावित जागेची पाहणी केली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कल्याण पश्चिमेतील 250 हेक्टर जागेमध्ये ही प्रस्तावित टाऊनशीप उभारली जाणार आहे. स्मार्टसिटी योजनेंतर्गत होणाऱ्या या प्रकल्पासाठी राज्य शासनाने कोरिअन कंपनीशी सहकार्य करार केला आहे. 


या करारानुसार कोरिअन सरकारमधील कॅबिनेट दर्जाचे अधिकारी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी कल्याण डोंबिवली महापालिकेत पदाधिकाऱ्यांची भेट घेऊन चर्चा केली.


 त्यानंतर सापर्डे येथील प्रस्तावित जागेची पाहणी करीत त्याबाबत माहिती जाणून घेतली.  टाऊनशीपसाठी आवश्यक सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून वर्षभरात त्याच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल अशी माहिती महापौर राजेंद्र देवळेकर यांनी दिली.